आज सुरु होतोय Poco X2 चा पहिला सेल, मिळणार ‘ही’ खास ‘ऑफर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या आठवड्यात पोको इंडियाकडून स्वतंत्र ब्रँड म्हणून पहिला Poco X2 हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला. अटलांटिस ब्लू, मीट्रिक्स पर्पल आणि फिनिक्स रेड या तीन रंगात उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन आज दुपारी १२ वाजेपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. सुरुवातीला १५ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध या फोनच्या पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना काही ऑफर्सही देण्यात येणार आहेत.

किंमत आणि फीचर्स
Poco X2 स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या रॅममध्ये उपलब्ध आहे. यात ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. तसेच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये. यासोबतच ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे कंपनीच्या या पहिल्या सेलमध्ये आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास किंवा ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.

या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये
Poco X2 स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला जाणार असून याचा ऑस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. सोबतच Adreno 618 GPU दिला असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर पॉवर्ड उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची आकर्षक गोष्ट म्हणजे यात लिक्विडकूल टेक्नोलॉजी दिली आहे. तसेच पोकोमध्ये IR blaster दिला आहे. ४ कॅमेरे असलेल्या या स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा हा ६४ मेगापिक्सलचा असून Sony IMX686 सेन्सर आहे. तसेच बॅकला ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फ्रंटला २० मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनच्या फ्रंटला ड्युअल इन स्क्रीन कॅमेरे दिले आहेत. फास्ट चार्जिंगसाठी २७ वॅट सपोर्ट उपलब्ध आहे. ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ६८ मिनिटात हा फोन शून्यापासून शंभर टक्के फुल चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.