हैद्राबादहून पुण्यात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या इंजिनिअरला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिस्टल आणि जीवंत काडतुसे विक्रीसाठी आलेला हैद्राबाद येथील गुन्हेगार पुण्यात आला असता त्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ३० हजार ८०० रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई रविवारी (दि.२१) बुधवार पेठेतील क्रांती हॉटेल चौकात करण्यात आली. इंजिनिअरची पदवी मिळून देखील नौकरी मिळत नसल्याने पिस्टलची विक्री करत असल्याची धक्कादायक माहीती तपासात समोर आली आहे.

हत्यारांची तस्करी करणारा बंटी पवार टोळीतील सराईत गजाआड

शिवकुमार उर्फ शिवा नरसिंग पाथलावत (वय-२० रा. बोडापंडा थांडा, गोविंदपल्ले, मेहबुबनगर, हैद्राबाद सध्या रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस शिपाई महावीर वलटे यांना आरोपीची माहिती मिळाली होती. गोऱ्या रंगाचा तरुण अंगामध्ये फुल बाह्यांचा टि शर्ट व निळी जिन्स पँट घातलेला तरुण बुधवार पेठेतील क्रांती हॉटेल चौकात पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. फरासखाना पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला असता पोलिसांना बघून आरोपीने पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतेली असता पँटच्या पाठीमागे एक गावठी बनावटीची पिस्टल खोवलेली दिसली तसेच खिशामध्ये दोन जीवंत काडतुसे सापडली. त्याच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…अन्यथा पुन्हा खळ्ळखट्याक : राज ठाकरे

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुनिल गवळी, पोलीस उप निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस हवालदार बापु खुटवड, केदार आढाव, महावीर वलटे, विनायक शिंदे, अमोर सरडे, हर्षल शिंदे दिनेश भांदुर्गे, विशाल चौगुले, शंकर कुंभार, अमेय रसाळ, विकास बोऱ्हाडे, मोहन दळवी, गणेश ढगे, आकाश वाल्मीकी, मयुर भोकरे यांच्या पथकाने केली.