पुण्यात ‘बोगस जामीन’ देणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, ‘त्या’ वकिलांवर होणार FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – न्यायालयात बनावट रेशनकार्ड, आधार कार्ड तयार करुन बोगस जामीनदार होणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने न्यायालयाच्या जवळील आवारात छापा घालून पकडले.

गुन्हे शाखेने या टोळीतील १० जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बनावट रेशनकार्ड, आधार कार्ड हस्तगत केली आहेत.

बनावट कागदपत्रांच्या आधारे काही वकिल आरोपीला जामीन मिळवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरुन मंगळवारी पोलिसांनी न्यायालया जवळील आवारात छापा घालून १० संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड जप्त केली आहे. हे बनावट जामीनदार असल्याचे माहिती असतानाही आरोपीचे जामीनपत्र घेऊन काही वकील जामीन करुन देत असल्याची माहिती त्यातून पुढे आली आहे. याबाबत आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यात काही वकिलांनाही आरोपी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी