पाकिटमार चोराकडून पोलिसाच्या हाताचा चावा, आरोपीचे पलायन

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिट चोरल्याच्या संशयावरुन पकडण्यात आलेल्या आरोपीने पोलिसाच्या हाताचा चावा घेऊन मारहाण करत पलायन केले. हा प्रकार बीड बस स्थानकावर सोमवारी (दि.३१) रात्री साडे आठच्या सुमारास घडला. याप्रकरणी रात्री दोनच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

गौतम मोहन जाधव (वय-५८) असे या घटनेत जखमी झालेल्या पोलिसाचे नाव असून त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राधेशाम आमटे हा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

फिर्य़ादी गौतम जाधव हे बस स्थानक चौकीमध्ये कर्तव्य बजावत होते. रात्री साडेआठच्या सुमारास निवृत्ती बापुराव डाखळे (रा. कोल्हापुर) यांनी चौकीत येऊन पाकिट चोरीला गेल्याचे सांगितले. गौतम जाधव आणि पोलीस शिपाई देशमुख हे घटनास्थळी गेले. त्यावेळी आरोपी हा संशयास्पदरित्या आढळून आला. जाधव यांनी त्याला पकडून चौकशी करीत असताना या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली.

या संधीचा फायदा घेऊन ओपी राधेशाम आमटे याने जाधव यांच्या नाकावर बुक्कीमारुन त्यांच्या डाव्या हात्याचा चावा घेऊन फरार झाला. आरोपीने नाकावर बुक्की मारल्याने जाधव यांना चक्कर आल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशीरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढगारे तपास करित आहेत.