गणेशोत्सव 2020

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

 

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे अतिमहत्वाच्या व्यक्तींना रांगेशिवाय दर्शन देण्यासाठी बाप्पाच्या समोरुन एक मार्ग खुला ठेवण्यात आला. या मार्गातून मंडळाचे कार्यकर्ते आपल्या ओळखीच्या व्यक्तींनी थेट बप्पाचे चरण स्पर्श करण्यासाठी सोडत होते. त्याचठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते आणि झोन ३ चे पोलीस उपायुक्त अविनाश कुमार यांच्याशी आधी शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते पोलीस उपायुक्तांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. हा संतापजनक प्रकार आज दुपारी घडला. मंडळांच्या कार्यकर्त्यांची आरेरावी पाहून पोलीस उपायुक्त आणि अन्य पोलीस अधिकारी संतापले होते.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2534cb11-bb29-11e8-91c3-bd12d6b30d14′]

दरवर्षी होणारी गर्दी पाहता मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येतो.मात्र, कर्तव्यावर असलेले पोलीस आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्यात ओळखीच्या व्यक्तींना थेट रांगेशिवाय बाप्पाचे चरण दर्शन देण्यावरून तसेच अन्य कोणत्या ना कोणत्या कारणावरून धक्काबुक्की, हाणामारी राजाच्या दरबारात होतच असते. त्याचप्रमाणे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांना काही कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरून त्यांच्याशी दादागिरी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर संरक्षणमंत्र्यांच्या हत्येची चॅटिंग 

त्यानंतर पोलीस उपायुक्त यांना राग अनावर झाला. त्यांनी त्या मुजोर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी बॅरिकेट चढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. याआधी देखील एका महिला पोलिसांच्या श्रीमुखात राजाच्या कार्यकर्त्याने लगावली होती. तर दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी अभद्रपणे कार्यकर्ते वागतात हे अनेकदा समोर आले आहे.
Back to top button