पुणे जिल्ह्यातील चांबळीमध्ये एकाचा जीव वाचवताना पोलिसांकडून हवेत गोळीबार

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – काल रोजी सासवड पोलीस स्टेशनचे सपोनि घुगे यांना चांबळी येथील एका व्यक्तीने (नाव – सागर कामठे) यांनी फोनद्वारे कळविले की, त्यांचा भाऊ महेश कामठे यास चांबळी येथील गुंड दिगंबर शेंडकर व त्याच्या सोबत पाच ते सहा मोटार सायकलवर आलेल्या साथीदार अपहरण करून घेऊन गेले आहेत. अशी माहिती मिळताच सपोनि घुगे यांनी सदर बाबत ठाणे अंमलदार व तपास पथकाचा स्टाफ यांना माहिती देऊन स्वतः मोटरसायकलने तपास पथकाचे पोलीस नाईक कोल्हे यांच्यासह चांबळी येथे रवाना झाले. चांबळी येथे पोहोचल्यानंतर त्यांना माहिती मिळाली की अपहृत व्यक्तीस आरोपी हे डोंगराच्या दिशेने घेऊन गेले आहेत.

अशी माहिती मिळताच सदर बाबत पोलीस निरीक्षक सासवड यांना माहिती दिली असता थोड्याच वेळात ते चांबळी येथे आल्याने त्यांना सविस्तर माहिती देऊन मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अपहृत व्यक्तीचा शोध घेणे कामी डोंगराच्या दिशेने जात असताना त्यांना दिसले की एक इसम खाली पडला असून सासवड पोलिस स्टेशन गु. र. नंबर 402/2019 आयपीसी 307 मधील मुख्य आरोपी दिगंबर शेंडकर हा त्याच्या डोक्यात मोठा दगड घालण्याच्या तयारीत आहे.

असे दिसताच सपोनि घुगे यांनी सदर व्यक्तीचा जीव वाचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या सर्व्हिस पिस्टल मधून हवेत एक गोळी फायर केली आहे. फायरचा आवाज ऐकून आरोपी डोंगराच्या दिशेने पळून गेले असून त्यांचा पोलीस निरीक्षक सासवड, सपोनि घुगे व व तपास पथकाचा स्टाफ यांनी आरोपींचा डोंगरात शोध घेतला. परंतु ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. जखमी व्यक्तीस उच्चार कमी ससून हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

सदर आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा, सासवड पोलिस स्टेशन, जेजुरी पोलिस स्टेशन, राजगड पोलीस स्टेशन, दंगल विरोधी पथक, शीघ्र कृती दलच्या टीम मार्फत शोध घेत आहेत. सासवड पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने यातील दोन आरोपी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे तपास करीत आहेत. घडलेल्या प्रकाराबाबत सासवड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून पुढील तपास सो पोलीस निरीक्षक डी एस हाके, सासवड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Visit : Policenama.com