Police Inspector Transfer Pune | गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात आणि खंडणी विरोधी पथक -1 च्या ‘प्रभारी’पदी व. पो. निरीक्षकांच्या नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Police Inspector Transfer Pune | शहर पोलीस दलात बुधवारी काही अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात विशेष शाखेत (Special Branch Pune Police) असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik) यांची गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागात (Social Security Cell Pune Police) बदली (Transfer) करण्यात आली आहे (अति.कार्य.). तर सामाजिक सुरक्षा विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane) यांची खंडणी विरोधी पथक १ (Anti Extortion Squad – 1) येथे बदली (अति.कार्य.) करण्यात आली आहे.

 

गेले काही महिने खंडणी विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षकपद रिकामे होते. सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा (API Sandeep Buva) यांची बढतीवर बदली झाली आहे.
त्यामुळे त्यांनी नव्या नियुक्तीच्या जागेवर जाण्यासाठी पुण्यातून त्यांना सोडण्याची आवश्यकता होती.
अरविंद माने यांच्याकडे सामाजिक सुरक्षा विभागाची जबाबदारी नुकतीच देण्यात आली होती (Police Inspector Transfer Pune).
त्यांची आता खंडणी विरोधी पथक १ ला बदली (अति.कार्य.) करण्यात आली आहे.
तर वाहतूक शाखेतून (Pune Traffic Police) विशेष शाखेत बदली करण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची सामाजिक सुरक्षा विभागात (अति.कार्य.) बदली (SS Cell Pune) करण्यात आली आहे.

 

Web Title :- Police Inspector Transfer Pune | Senior Inspector Rajesh Puranik has been transferred in the Social Security Cell of the Pune Police Crime Branch while Senior Inspector Arvind Mane has been appointed in the Anti Extortion Squad – 1

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा