भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडे आठ वाजता सोमटणे येथे मुंबई-पुणे मार्गावर घडली. पुण्यातील मिलिंद मकासरे यांचा दोन दिवसांपूर्वीच अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

सागर भागवत नेहे (२८, रा. सावरगाव (तळ), ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नेहे हे नवी मुंबई येथील खारघर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहे काही कामानिमित्त पुण्यात आले होते. रविवारी रात्री साडे आठ वाजता ते सोमटणे येथून दुचाकी वरून जाताना हा अपघात झाला आहे. या प्रकरणी फरार वहान चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर