DYSP जाधव यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर

नीरा, पोलीसनामा आँनलाईन – पुरंदर -भोर उपविभागाचे डिवायएसपी आण्णासाहेब जाधव यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे दिला जाणारा आंतरिक सुरक्षा सेवा पदक नुकताच जाहीर झाला आहे.

आण्णासाहेब जाधव यांनी गडचिरोली येथे आँगस्ट २०१५ ते आँगस्ट २०१७ या कालावधीत
डिवायएसपी या पदावर कार्यरत असताना नक्षलवाद्यां विरोधात कारवाया करून तेथील जनतेमध्ये पोलिसांच्या विषयी विश्वास निर्माण करून जनता व पोलिस यांच्यामध्ये संबंध सुधारले. या उल्लेखनीय कार्याची केंद्रीय गृह मंत्रालयाने दखल घेऊन पुरंदर -भोर उपविभागाचे डिवायएसपी आण्णासाहेब जाधव यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले आहे.

यापुर्वी आण्णासाहेब जाधव यांना गडचिरोली येथील उल्लेखनीय कार्यामुळे सन २०१८ मध्ये पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह, सन २०१९ मध्ये राज्य सरकारने विशेष सेवा पदक बहाल करून सन्मानित करण्यात आले आहे. डिवायएसपी आण्णासाहेब जाधव यांना  केंद्रीय गृह मंत्रालयाचा आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाल्याबद्द्ल पुरंदर तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.