शस्त्रास्त्रे घेऊन फरार झालेला पोलीस अधिकारी दहशतवादी संघटनेत सहभागी

श्रीनगर : वृत्तसंस्था

७ एके-४७ आणि १ पिस्तुल अशी ८ शस्त्रास्त्रे घेऊन फरार झालेला जम्मू-काश्मीरमधील विशेष पोलीस अधिकारी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला आहे. आदिल बशीर (वय 24 वर्षे) असे फरार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो शोपिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो गेल्या आठवड्यात फरार झाला होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’80fb8ee3-c582-11e8-96ec-cf16d17e1bf0′]

हिज्बुलचा कमांडर जीनत-उल-इस्लामसोबत आदिल बशीरचा फोटो आज सोशल मीडियावर वायरल झाला आहे. त्याने एके-४७ रायफल हातात धरुन फोटे काढला आहे. बशीर गेल्या आठवड्यात आमदार एजाज मीर यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात होता. तिथून तो ७ रायफल आणि १ पिस्तुल अशी ८ शस्त्रास्त्रे घेऊन फरार झाला. चाैकशी दरम्यान एका व्यक्तीनं आदिल बशीरला पळून जाण्यात मदत केली असल्याचे समोर आले आहे. त्याची ओळख पटली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

[amazon_link asins=’B01N0U3K9Q,B076BMBFGF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9198075d-c582-11e8-9aa1-f7289cb0bd33′]

वाछी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे पीडीपीचे आमदार एजाज अहमद यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी आदिल बशीर ला तैनात करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले असून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आदिल बशीर ७ एके-४७ रायफल आणि १ पिस्तुलासह फरार झाल्यावर आमदार एजाज अहमद यांच्या सुरक्षेत असलेल्या १० खासगी सुरक्षारक्षकांची चौकशी करण्यात आली.

एल्गार परिषद : गाैतम नवलखा यांची नजरकैदेतून सुटका

जाहिरात.