Lockdown : विनाकारण मास्कशिवाय फिरणाऱ्या 9 जणांवर FIR

लासलगाव – कोरोना लाॅकडाऊन असतांनाही लासलगाव येथे विनाकारण मास्कशिवाय फिरणारे इसमाविरूध्द आज लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे व लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी संयुक्तरित्या कारवाई केली असुन नेमुन दिलेल्या जागेत भाजीपाला विक्री न करणारे विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

आज मास्क न घालता फिरणारे इसमावर एकूण 9 गुन्हे दाखल केले असून 1 मो सा जप्त केली आहे…तसेच मो सा वर फिरणारे 23 वाहनावर कारवाई करून 4600 रु दंड वसूल केला आहे… तसेच ग्राम पंचायत ने नेमून दिलेल्या ठिकाणी न बसणारे भाजीपाला विकणारे इसमावर ग्राम पंचायत ने पावती फाडून दंडात्मक कारवाई केली आहे.

सोमवारी सायंकाळी लासलगाव ग्रामपंचायत येथे कोरोना रोगाच्या संदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी किराणा दुकाने हि सकाळी 10 ते 4 यावेळेतच चालु ठेवावी अन्यथा सदर दुकानदारावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल व तोंडाला मास्क नसेल तर 500 /- दंड आकारण्यात येईल असे ठरविण्यात आले.तसेच सदर बैठकित गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन गावात पोलीस मित्र हि संकल्पना राबविण्यात येणार आहे.याबैठकी दरम्यान मुंबई कृ.उ.बा.समिती संचालक जयदत्तजी होळकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक खंड़ेरावरंजवे , ग्रामविकास अधिकारी शरद पाटील व प्रतिष्ठित नागरीक तसेच लासलगाव प्रेस क्लबचे पत्रकार बांधव उपस्थित होते.