कर्‍हाडमध्ये गेल्या 20 वर्षात 50 लाखांच्या बनावट नोटा जप्त तर 25 जणांना अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जिल्ह्यातील कऱ्हाड ही सर्वात मोठी उलाढालीची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. वीस वर्षांत तब्बल पन्नास लाखांच्या बनावट नोटा खपवण्याचा येथे प्रयत्न झाला. प्रत्येक वेळी पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, बनावट नोटा विकणार्‍यांना पंचवीस संशयितांना गजाआड केले. त्यात सांगली जिल्ह्यासह इचलकरंजी रेंदाळचे कनेक्शन आहे त्याद्वारे कर्नाटकपर्यंतही धागेदोरे आहेत. परिणामी पोलिस तपासाला मर्यादा येते.

बनावट नोटा आणि पोलिस कारवाया

सुमारे वीस वर्षांपूर्वी दोन लाखांच्या बनावट नोटांसह नऊ संशयिताना अटक केली होती. त्यातील दोन कऱ्हाडचे तर अन्य तिघे सांगली व दोघे कर्नाटकातील होते. २००३ मध्ये १३ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून ७ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. यावेळी युवा नेत्यांसह दोन महिलांना ही अटक झाली होती. पुन्हा २००५ मध्ये नऊ जणांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. २००३ व २००५ मध्ये अटक झालेल्यांच्या टोळीचा सूत्रधार एकच होता. जामिनावर बाहेर आल्यावर तो पुन्हा बनावट नोटा तयार करू लागला.

नोटात वापरल्या जाणाऱ्या महात्मा गांधींच्या फोटोंचा संशयितांनी केलेल्या ‘वॉटर मार्क’ने पोलिसही चक्रावले होते. सर्वात मोठी कारवाई २०१४ मध्ये झाली. त्यातही २००३ व २००५ मधील संशयिताला तब्बल २९ लाखांच्या बनावट नोटांसह अटक झाली. त्या दोघांनी नावट नोटा तयार केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे तो तपास पुढे झाला नाही. त्यापूर्वी २०१२ मध्ये वेगवेगळ्या कारवायांत तब्बल दोन लाख हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्या चौघांना अटक झाली. त्यानंतर अंबवडे येथे एलसीबीने केलेल्या कारवाईत दोन लाख ९४ हजार च्या नोटा जप्त केल्या. वीस वर्षांत कारवाई करताना पोलिसांनी तब्बल पन्नास लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. मात्र, या टोळ्यांनी अटक होण्यापूर्वी बनावट नोटा खपवण्याची भीती आहे.

रकमेच्या दुप्पट किमतीच्या नोटा बनावट

नोटा पुरविणारे खऱ्या नोटा जेवढ्या देतील त्याच्या दुप्पट बनावट नोटा त्यांना दिल्या जातात. म्हणजेच ५० हजार दिले, की एक लाखाच्या बनावट नोटा होण्यासाठी दिले जातात. हा ठरलेला व्यवहार आहे. दुप्पट पैसे मिळवण्यासाठी हा शॉर्टकटचा मोह त्यांना धोक्याचा ठरतो आहे. आतापर्यन्त अटक झालेले संशयित चाळीशीतील आहेत.