पोलिसांना गोळ्या घालून मारण्याची धमकी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पान टपरी समोर सिगारेट पिण्यासाठी गेले असताना कारण नसताना त्यांना त्रास देणाऱ्यांना पोलीस चौकीत आणले. याचा राग मनात धरुन तिघांनी लोखंडी पाईपने चौकीतील टेबल, काचेची तोडफोड केली. तसेच पोलिसांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हा शुक्रवारी रात्री दहा वाजता पिंपळे सौदागर चौकीत घडला. त्यांनी गोळ्या घालून पोलिसांना मारण्याची धमकी दिली आहे.

सुनील सखाराम बोकड (४३, सांगवी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. तर अनिल गोरख दळवी (३०, रा. रोज लॅन्ड रेसिडेन्सी, पिंपळे सौदागर), अविनाश गोरख दळवी (२५) आणि प्रकाश शिवदास कडभने (२३, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी बोकड हे पोलीस चौकीत आत्महत्या झालेल्या घटनेची खबर घेत होते. त्यावेळी श्रीधर कडते व त्यांची बहीण चौकीत आले.

कडते हे गणेश पान टपरी, कुणाल आयकॉन रोड येथे सिगरेट घेण्यासाठी गेले होते. सिगरेट घेवून ती ओढत असताना अटक केलेले तिघेजण त्या ठिकाणी आले. या ठिकाणी सिगारेट ओढायची नाही असे म्हणून, काही एक कारण नसताना लाकडी दांडके, सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. तसेच गळा आवळून पोटावर, पाटीवर बेदम मारहाण केली. ही माहिती कडते हे पोलीस कर्मचारी बोकड यांना सांगत होते. त्यावेळी चिडून या तिघांनी चौकीत गोंधळ घातला. त्यानंतर बाहेर जाऊन फ्लेक्सची लोखंडी पाईप काढून पोलिसांच्या अंगावर धावून आले. चौकीतील टेबल, खुर्च्यांची तोडगोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. गोळ्या घालून पोलिसांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : दहीहंडी फ्लेक्स लावण्यावरून तरुणाचा खून

चिंचवड पोलीस ठाण्यात मद्य प्राशन केलेल्या कलाकार तरुणींनी गोंधळ घातल्याचा प्रकार ताजा असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff520449-adae-11e8-abb8-5bc043daa8bd’]