Lockdown : भाजी मार्केटमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला, तलवारीनं कापले हात, 2 जखमी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंजाबच्या पटियाला येथील मोठ्या भाजी मंडी सनौर रोडवरील कर्फ्यू दरम्यान लोकांनी पोलिस पथकावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा हात कापला गेला, तर दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की चार-पाच ‘निहंग’ (पारंपारिक शस्त्रे परिधान करणारे आणि निळे लांब शर्ट घालणारे शीख ) लोक एका कारमध्ये जात होते आणि मंडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सकाळी ६. १५ च्या सुमारास भाजी मार्केटजवळ थांबण्यास सांगितले. पटियालाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनदीप सिंह सिद्धू म्हणाले, “त्यांना पास दाखवण्यास (कर्फ्यू) सांगितले, परंतु त्यांनी त्यांच्या कारने तेथे लावलेली दारं आणि ब्लॉकर्सला धडक दिली.”

तलवारने कापला हात
ते म्हणाले, ‘सहाय्यक सब इन्स्पेक्टरचा (एएसआय) हात तलवारीने कापला गेला. पटियाला सदर पोलिस स्टेशनच्या प्रभारीच्या कोपरला दुखापत झाली आहे, तर दुसर्‍या पोलिस अधिकाऱ्याच्या हातालाही या हल्ल्यात दुखापत झाली आहे.

निहंग फरार
एएसआय यांना राजेंद्र रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्याला पीजीआयएमआर चंदीगड येथे पाठविण्यात आले. एसएसपीने सांगितले की, हल्ला झाल्यानंतर निहंग घटनास्थळावरून फरार झाले, त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात निर्बंध लागू होत असताना ही घटना घडली. कर्फ्यू आणि लॉकडाऊनच्या नियमांनुसार गेल्या 24 तासांत पंजाबमधील पोलिस पथकांवर हल्ल्याची तिसरी मोठी घटना आहे.