‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’चा ट्रेलर रिलीज (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘ सविता भाभी .. तू इथच थांब ‘ ह्या पोस्टरमुळे गेले दोन तीन दिवस पुणेकर संभ्रमात होते , त्या पोस्टरमागील रहस्य आता समोर आले आहे. कारण ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ ‘ चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सध्या तरुणाईत त्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहेत.

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’चित्रपटाच्या टिझरमध्ये कोणतेही पात्र दाखवण्यात आलेले नाही. . ‘हॅलो… मी सविता…तुझी सविता… तुम्हाला माहीत असलेली पण तुम्ही कधीही न पाहिलेली’… अशा प्रकारे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. अख्खं शहर वाट बघतंय तुझी! अशा कॅप्शनसहीत अभिनेत्री पर्ण पेठे हिनं हा टिझर शेअर केला आहे.

गेले काही दिवस पुणेकर या पोस्टरमुळे वैतागलेले होते. नंतर कळाले की हा पोस्टरचा खटाटोप चित्रपटाच्या प्रमोशनसाठीअसल्याचे समोर आले आहे. सविता भाभीच्या पोस्टरमुळे सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका पर्ण पेठे साकारणार असून बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर सुद्धा या चित्रपटात काम करणार आहे.

अभिनेता आलोक राजवाडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या निमित्ताने तो दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटात सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके हे कलाकार देखील झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती गौरी आणि बनी डालमिया, सुरेश देशमाने, विनोद सातव यांनी केली आहे. हा चित्रपट ६ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

You might also like