Pollution Affecting Your Brain | तुमचा मेंदूसुद्धा कमजोर करतंय घातक प्रदूषण, विस्मरण होत असेल तर व्हा सावध; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pollution Affecting Your Brain | हवेतील वाढत्या प्रदूषणाचा तुमच्या मेंदुच्या काम करण्याच्या क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. प्रदूषणाचा स्तर वाढल्याने लोकांची प्रॉडक्टिव्हिटी सुद्धा कमी होते. क्विन्सलँड युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे की, काही काळापर्यंत गंभीर वायु प्रदूषणाच्या परिसरात राहणार्‍या लोकांच्या मेंदूच्या क्षमतेवर (Pollution Affecting Your Brain) परिणाम होतो.

 

क्विन्सलँड युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (University of Queensland School of Economics) च्या संशोधक डॉ. एंड्रा ला नाऊजे (Dr. Andra La Nouze) यांच्यानुसार डेटाचा अभ्यास केल्यानंतर समजले की, वायु प्रदूषणाने काम करणार्‍या तरूणांच्या क्षमतांचे नुकसान केले आहे. मेंदू प्रत्येक छोटे-मोठे काम करण्याची प्रक्रिया साठवतो.

 

प्रदूषणामुळे मेंदूच्या या क्षमतेवर परिणाम होतो (Pollution affects the capacity of the brain). तसेच लोकांना काही नवीन शिकण्यास सुद्धा जास्त वेळ लागतो. हवेतील PM 2.5 कणांचा आकार खुप छोटा असतो. इतका छोटा की, श्वासातून ते फुफ्फुसापर्यंत पोहचतात. येथून रक्तात मिसळून हृदयापर्यंत जातात. ज्यामुळे हृदयारोगांचा धोका वाढतो.

 

रिसर्चमध्ये मिळालेल्या रिझल्टनुसार वायु प्रदुषणाचा सर्वात जास्त परिणाम 50 पेक्षा कमी वयाच्या लोकांवर दिसून आला.
प्रदूषणामुळे या लोकांच्या नोकरीतील कामगिरीवर सुद्धा दिवसेंदिवस परिणाम होण्याची शक्यता (Pollution Affecting Your Brain) आहे.

रिसर्चमध्ये आढळले आहे की, प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम लोकांच्या स्मरणशक्तीवर पडतो.
याचा स्पष्ट अर्थ आहे की, प्रदूषणामुळे मेंदूवर जो परिणाम होतो त्यामुळे सर्वात जास्त
अशा व्यवसाय किंवा कामांवर परिणाम होण्याची शक्यता असते ज्यात विश्वास किंवा स्मरणशक्तीची गरज असते.

 

डॉ. आंद्रा ला नाऊजे यांच्यानुसार, ऑस्ट्रेलियामध्ये रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात जंगलांना आग लागण्याची प्रकरणे समोर येत आहेत.
या आगीच्या प्रदुषणामुळे ऑस्ट्रेलियात काम करणार्‍या तरूणांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे.

 

Web Title :- Pollution Affecting Your Brain | pollution is badly affecting your brain be cautious if you are forgetting things marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corporation | महापालिका आयुक्तांनी खरेदीला लावलेला ‘ब्रेक’ नगरसेवकांनी केला ‘सैल’ ! बकेट, बेंचेस, कापडी पिशव्या खरेदीला मंजुरी

Nashik Crime | रिसॉर्टमध्ये डॉक्टर वधुच्या ‘कौमार्य’ चाचणीचा प्रकार उघडकीस; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Madhavi Gogate | ऑनस्क्रीन आईच्या निधनानंतर अनुपमा फेम Rupali Ganguly ला मोठा धक्का, म्हणाली – ‘खुप काही शिल्लक राहिलं’