‘साऊथ सिनेमांमध्ये स्त्रियांच्या नाभीचं जास्त आकर्षण’ : पूजा हेगडे

पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ सिनेमात आपली ओळख निर्माण करत लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde)आपल्या एका वक्तव्यामुळं चांगलीच चर्चेत आली आहे. अलीकडेच्या झालेल्या एका मुलाखतीत तिनं. दाक्षिणात्य सिनेमांबद्दल प्रतिक्रिया दिली. यानंतर ती ट्रोलही झाली. यावर तिनं पुन्हा स्पष्टीकरणही दिलं आहे.

पूजा म्हणाली होती की, दीक्षिणात्य सिनेमात स्त्रियांच्या नाभीचं आणि कटिभागाचं जास्त आकर्षण असतं. तिच्या या वक्तव्यानंतर ती ट्रोल झाली. यावर तिनं स्पष्टीकरण दिलं आहे. पूजा म्हणाली, साऊथ सिनेइंडस्ट्रीसोबत मी नेहमीच कृतज्ञ राहीन. माझी संपूर्ण मुलाखत पाहा आणि मग बोला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे असं ती म्हणाली आहे. इंस्टा पोस्टमधून तिनं हे स्पष्टीकरण दिलं आहे.

https://www.instagram.com/p/CHXCV7dpuN4/

पूजा म्हणते, मुलाखतीमधील माझ्या वक्तव्याच विपर्यास केला गेला. माझी वक्तव्ये फिरवली जाऊ शकतात. परंतु टॉलिवूडविषयी असलेलं माझं प्रेम कमी होणार नाही. तेलगू फिल्म इंडस्ट्री ही नेहमीच माझ्यासाठी महत्त्वाची असेल. ज्यांना माझे सिनेमे आवडतात त्या चाहत्यांनाही ही गोष्ट माहीत असेल. मी पुन्हा एकदा सांगते, तेलगू फिल्म इंडस्ट्रीची मी कायम ऋणी राहीन, असंही ती या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

https://www.instagram.com/p/CFGQHsMht20/

पूजाला एका मुलाखतीत तेलगू स्त्रियांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तिच्याच अला वैकुंठपुरामुलू या सिनेमाचं उदाहरण दिलं. साऊथ सिनेमात स्त्रियांच्या नाभीचं सर्वाधिक आकर्षण असल्याची कबुली तिनं दिली. याशिवाय नाभीपेक्षा स्त्रियांचे पाय पुरुषांना जास्त आकर्षित करू शकतात असंही तिनं सांगितलं होतं.

https://www.instagram.com/p/CGzAw10DkcQ/

https://www.instagram.com/p/CF1y4zLhu39/

https://www.instagram.com/p/CFtVtZPB6cu/

https://www.instagram.com/p/CFhDkybBhb8/

https://www.instagram.com/p/B_cutYspBNu/