पुजा सावंतचे ‘ते’ फोटो सोशल मिडीयावर व्हायरल..

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चेहरे येतात प्रसिद्ध होतात आणि जातात. त्यामध्ये अनेक चेहरे लक्षात राहण्यासारखे असतात आणि टिकून राहतात. त्यातील एक चेहरा आणि तो या अभिनेत्रीचा. ती म्हणजे पुजा सावंत…तिने अनेक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करुन चाहत्यांना वेड लावले आहे. ती सतत सोशल मिडीयावर अपडेट असते. तिचे अनेक वेगवेगळे अंदाज फोटोत पहायला मिळत असते. ती नेहमी तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

नुकताच पुजाने इन्स्टाग्राम वर चाहत्यांना वेड लावण्यासारखा फोटो शेअर केला आहे. त्याफोटोमध्ये तिचा एक वेगळी अदा दिसून येत आहे. तिच्या या घायाळ करणाऱ्या फोटोचे चाहत्यांना वेड लागले आहे. याफोटोला चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. तिने तिच्या अभिनयाने तर चाहत्यांना वेड लावलेच आहे. पण फोटोत ही तिची सुंदरता कमी दिसत नाही. ति मराठी चित्रपटात काम करत स्वतःची छाप टाकणार हे नक्कीच…

 

 

पुजाने अनेक मराठी चित्रपट केले आहे. त्यामध्ये तिने वेगवेगळ्या भुमिका साकारल्या आहे. तिने भूमिकेतून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिने क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपट सृष्टीत पर्दापण केले आहे. यानंतर तिने आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा चित्रपटात काम देखिल केले आहे.