Poonch Terrorist Attack | जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक ! JCO सह 5 भारतीय जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था – Poonch Terrorist Attack | जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir Encounter) पूंछ भागात आज (सोमवार) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत (Poonch Terrorist Attack) भारतीय सैन्य दलाचे 5 जवान शहीद झाले आहे. सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. या चकमकीत जेसीओसह पाच जवान शहीद (jco and four soldiers martyred) झाले आहेत.

जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील (poonch district) डेरा की गली भागात सुरक्षा दल
आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत (Poonch Terrorist Attack) जेसीओसह पाच जवान शहीद झाले.
मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 4 दहशतवाद्यांनी सीमा पार करुन पूंछ जिल्ह्यात घुसखोरी केली होती.
त्यानंतर हे दहशतवादी काश्मीर खोऱ्याचे (Kashmir Valley) दिशेने रवाना झाले.

भारतीय सुरक्षा दलानं (Indian security force) मुगल रोड जवळील डेरा की गली परिसरात या चार दहशतवाद्यांना घेरलं.
त्यानंतर भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार (Firing) सुरु झाला. या चकमकीत 5 सैनिक गंभीर जखमी झाले होते.
त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Web Title :- Poonch Terrorist Attack | Jammu Kashmir JCO and 4 soldiers lost their lives during counter-terrorist operation in Pir Panjal ranges

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Children Psychiatric Problems | मुले ऑनलाइन स्क्रीनवर 4 तासापर्यंत घालवत असतील वेळ तर व्हा सतर्क, मोबाइल आणि लॅपटॉपचे व्यसन बनवतेय मानसिक रुग्ण

RIL | ‘रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड’ कडून ‘आरईसी सोलर होल्डिंग्स’ 771 दशलक्ष डॉलर मध्ये खरेदी

Cumin Side Effects | लो ब्लड शुगर, किडनी-लिव्हर डॅमेज, अडचणीत आणू शकतात जिर्‍याच्या ‘हे’ 5 साईड इफेक्ट