पुणे महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत पोफळे, ढोरे, जाधव विजयी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या फुरसुंगी-लोहगाव (प्रभाग क्रमांक ४२) मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली. फुरसुंगी-लोहगाव मधील निवडणुकीत राष्ट्रवादीचे गणेश ढोरे भाजपाच्या अश्विनी पोकळे हे निवडून आले आहेत. तर धानोरी-विश्रांतवाडी (प्रभाग १) मधून भाजपाच्या वृषाली जाधव विजयी झाले आहेत.

गणेश ढोरे यांना २६ हजार ३०४ मते मिळाली. शिवसेनेचे अमोल हरपळे यांना २० हजार २२४ मते मिळाली. भाजपाच्या अश्विनी पोकळे यांनी २४ हजार ८५१ मते घेतली. त्यांनी विरोधी कामठे यांचा ९३२ मतांनी पराभव केला. कामठे यांना २३ हजार ९१९ मते मिळाली. धानोरी-कळस-विश्रांतवाडीतून जाधव यांना ७ हजार १०० मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या रेणुका चलवादी यांना ४ हजार मते मिळाली.

या प्रभागातील भाजपाच्या किरण जठार यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने या गटातील एका जागेसाठी पोटनिवडणुकी झाली. येथील वंचित बहुजन आघाडीच्या रोहिणी टेकाडे यांना २ हजार ९०० मते मिळाली.