41 वर्षांचा पॉप्युलर आर्टिस्ट राम इंद्रनील कामतचा मृत्यू, बाथटबमध्ये सापडला मृतदेह

मुंबई : राम इंद्रनील कामत आर्टिस्टसह एक फोटोग्राफर सुद्धा होता. त्याचे ग्लासवर्क पेंटिंग मुंबईच्या आर्ट सर्किटमध्ये खुप फेमस होते. तो मायथोलॉजिस्ट सुद्धा होता. राम इंद्रनील कामतच्या निधनाने त्याच्या कुटुंबियांना आणि निकटर्वीयांना धक्का बसला आहे.

राम इंद्रनील कामत त्याच्या मुंबईतील घरात बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळला. तो मुंबईच्या माटुंगा येथे राहात होता. पोलिसांनी प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ही आत्महत्येची केस असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांना सापडली सुसाईड नोट
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. रामने आपल्या सुसाईड नोटमध्ये कुणालाही या घटनेसाठी जबाबदार ठरवलेले नाही. पोलीस राम इंद्रनील कामतच्या कुटुंबिय आणि निकटर्वीयांची चौकशी करत आहेत. राम कामत मोठ्या कालावधीपासून तणावात होता आणि लॉकडाऊनने त्याची स्थिती आणखी वाईट केली होती. राम 41 वर्षांचा होता. तो आपल्या आईसोबत राहात होता. तो आपण महालक्ष्मीची आवडती संतती असल्याचे म्हणत असे.

कोरोना काळात अनेक सेलेब्सने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. यामध्ये टीव्ही आणि फिल्म जगतातील कलाकारांचा समावेश आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरण सध्या खुप गाजत आहे. ज्याने 14 जूनला बांद्रा येथील आपल्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती.