पश्चिम महाराष्ट्रातील ख्यातनाम उद्योजक दिलीप जाधव यांचं निधन

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाइन – पश्चिम महाराष्ट्रातील ख्यातनाम उद्योजक तसेच शेती अवजारे निर्मितीमध्ये आपली वेगळी छाप सोडलेल्या अग्रगण्य कंपनी पॉप्युलर स्टील वर्क्सचे मालक दिलीपराव केशवराव जाधव (वय६७) यांचं अल्पशा आजराने निधन झालं आहे. त्यांच्या पश्च्यात भाऊ उद्योजक राजेंद्र जाधव, पत्नी, दोन मुले, सून, नातवंड असा परिवार आहे.

वडिलांनंतर दिलीपराव जाधव यांनी केवळ निरीक्षण आणि मेहनत या जोरावर उत्पादन तंत्रातील बारकावे आत्मसात केले. यांत्रिकीकरणातील बदलांचा वेध घेऊन त्यांनी शेतीमध्ये उपयोगी पडणारी अवजारे बनविण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी आपल्या कारखान्यामध्ये स्वतंत्र रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट विभाग सुरु केला. येथे रात्रीचा दिवस करून त्यांनी विविध अवजारांचे आराखडे तयार केले. दोन व तीन फाळी पलटी नांगर, हायड्रॉलिक ऑपरेटेड पल्टी नांगर, स्वयंचलित पेरणी यंत्र, ऊस भरणी औजार, रोटर, ओढता डिस्क हॅरो, गादी वाफ यंत्र, बैली नांगर, सायकल कोळपा इत्यादी प्रकराची सुमारे १०० च्या वरती विविध आणि शेतीसाठी उपयुक्त आणि हाताळण्यास सोपी असणारी अवजारे बनवली.

देशात त्यांच्या या अवजारांची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली. दिलीपराव जाधव यांच्या दूरदृष्टीने आणि मेहनतीवर त्यांनी हा पॉप्युलर हा ब्रँड विकसित केला. तसेच मॅक्सिको देशाने त्यांना “इंटरनॅशनल डायमंड स्टार फॉर क्वालिटी ऑर्डर’ या पुरस्काराने सन्मानित केलं. या शिवाय महाराष्ट्र शासनाने त्यांना गुणी उद्योजक या पुरस्काराने सन्मानित केलं. कोल्हापूर महानगरपालिकेने दिलीपराव जाधव यांना कोल्हापूर भूषण पुरस्काराने गौरवले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like