फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये करा पैसे दुप्पट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कोरोनामुळे सर्वांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल आहे. गुंतवणूक करावी तर पैसे बुडण्याची भीती वाटत राहते. आता कोणत्याही जोखमीशिवाय गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या (Post Office) किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme ) या योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. सध्या पोस्ट ऑफिस (Post Office) आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या स्कीम ऑफर करत आहे.

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme ) या योजनेच्या अटी पाहू. या योजनते कोणताही भारतीय नागरिक यात गुंतवणूक करू शकतो. तसेच त्यात कमीतकमी एक हजार रुपये गुंतवणूक करू शकता. अधिक रकमेची मर्यादा नाही. फक्त ही गुंतवणूक एकरकमी असावी. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारास त्याच्या मॅच्युरिटीनंतर जमा केलेली रक्कम दुप्पट मिळते. गुंतवणूकदारांना रक्कम दुप्पट होण्याची पूर्णपणे हमीदेखील दिली जाते.

१८ वर्षा पूर्ण असलेलाच या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो. असे असले तरी सिंगल आणि ज्वॉइंट खातेधारकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या योजेनेत पोस्ट ऑफिसकडून १२४ महिन्यांत (१० वर्षांनंतर) पैसे दुप्पट होण्याची हमी देण्यात येत आहे. सरकारने २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेचा व्याजदर ६.९ टक्के ठरवला आहे. पैसे किती दिवसांमध्ये दुप्पट होऊ शकतात ते व्याजदरावर अवलंबून आहे.

उदाहरण दाखल तुम्ही जर किसान विकास पत्र या योजनेअंतर्गत तुम्ही सध्या दहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास १२४ महिन्यानंतर (१० वर्षांनंतर) तुम्हाला दुप्पट रक्कम म्हणजे २० लाख रुपये मिळतील. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅच्योरिटीवर गुंतवणूकधारकाकडून पोस्ट ऑफिस टॅक्सच्या स्वरुपात एक रुपयाही घेत नाही. किसान विकास पत्र या योजनेअंतर्गत १००० रुपये, ५००० रुपये, १०, ००० रुपये आणि ५०, ००० रुपयापर्यंतचे सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहेत.