इंडियन ऑइल मध्ये भरती, B. Sc. धारकांना 1.05 लाखावर वेतन

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) मध्ये अनेक पदांवर भरती होणार आहे. या पदांसाठी 25000 ते 1.05 लाख दर महिना पगार दिला जाणार आहे. भरतीशी संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा गणित, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये बीएससी झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवायची हि उत्तम संधी आहे. वेगवेळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे. याची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या वेबसाईटवर तुम्हला मिळेल.

कोणत्या पदांसाठी किती पदे

ज्यूनियर इंजीनियरिंग असिस्टंट-4 (प्रोडक्शन) – 49 पदे
ज्यूनियर इंजीनियरिंग असिस्टंट-4 (मेक फिटर कम रिगर) / ज्यूनियर टेक्निकल असिस्टंट – 03 पदे
ज्यूनियर इंजीनियरिंग असिस्टंट-4 (इंस्ट्रूमेंटेशन) – 04 पदे
ज्यूनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट – 01 पदे
एकूण जागा : 57

अर्ज कसा कराल ?

इंडियन ऑईल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. 12 ऑक्टोबर 2020 पासूनअर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार 07 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया :

या पदांवर योग्य उमेदवाराची निवड लिखित परिक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परिक्षा 29 नोव्हेंबरला होणार आहे.