जीडीएस ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये PPF, SCSS, NSC, KVP, MIS खाती उघडता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जीडीएस ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये आता पीपीएफ, एससीएसएस एनएससी, केव्हीपी आणि एमआयएस खातं उघडता येणार आहे. दळणवळण मंत्रालयाने याबाबत अधिसुचना जारी केली आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील गुंतवणुकदारांना सर्वाधिक होणार आहे. ही खाती जीडीएस ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये उघडण्यास मान्यता मिळावी यासाठी वारंवार मागणी होत होती. शासकीय बचत पदोन्नती सर्वसाधारण नियम 2018 अंतर्गत जीडीएस ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये ही खाती उघडण्यास परवानगी देण्यात बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती खालील प्रमाणे
– एसबी ऑर्डर ता. 16/06/2020 अंतर्गत चेकद्वारे जीडीएस ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडता येऊ शकतं.

– एमआयएस/एससीएसएस खातं सीडीएस ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये उघडण्यासाठी खातेधारकांच्या पीओ बचत खात्यातून मासिक व त्रैमासिक हप्त्याची रक्कम वसूल करण्यात येईल. कर्ज अथवा पीपीएफमधून पैसे काढल्यास संबंधित रक्कम ही खातेधारकाच्या पीओ बचत खात्यात जमा होईल.

– संबंधित खातं कार्यालयास पात्रता, अटी व मर्यादा निश्चित करण्याचा अधिकार आहे.

– दरम्यान, एसीएसएस डिपॉझीटरच्यावतीने फॉर्म क्रमांक 15G/15H जीडीएस ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये दाखल केल्यास कार्यालयाकडून संबंधित रिसिप्टचं अपडेशन होईल.

– उल्लेखनीय म्हणजे एका व्यक्तीलाच पीपीएफ अकाऊंट उघडण्याची मुभा आहे. इतर खातं उघडण्यासाठी लहान मुलांच्या नावावर खात उघडण्याची अनुमती आहे. पीपीएफला 15 वर्षाचा कालावधी आहे. तर किमान 500 रुपये आणि जवळपास 1.5 लाख (सेल्फ प्लस मायनर अकाऊंट) प्रत्येक आर्थिक वर्षात खात्यात जमा करु शकतात.