फायद्याची गोष्ट ! हमखास नफा होतोय मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममधून, LIC व्दारे तुम्ही देखील घेवु शकता ‘लाभ’

नवी दिल्ली : नुकतेच केंद्र सरकारने पंतप्रधान व्यय वंदना योजनेचा (एीएमव्हीव्हीवाय) कालावधी 3 वर्षांसाठी वाढवला होता. या मंजूरीनंतर आता पीएम व्यय वंदना योजनेची अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेत वरिष्ठ नागरिकांसाठी एक स्कीम आहे, ज्यामध्ये मासिक पेंशनचा पर्याय आहे. यामध्ये वरिष्ठ नागरिकांना 10 वर्षापर्यंत ठरलेल्या दराने गॅरंटेड पेन्शन मिळते.

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे दिला जातो.या स्कीमवर 7.40 टक्के वार्षिक दराने व्याज मिळते. आतापर्यंत सुमारे 6.28 लाख लोकांनी या सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे. 7.40 टक्के व्याजाचा लाभ त्या लोकांना मिळेल, जे चालू आर्थिक वर्षात ती सबस्क्राइब करतील. तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता ते जाणून घेवूयात…

कुणासाठी आहे ही योजना
केंद्र सरकारच्या या स्कीमचा लाभ घेण्यासाठी किमान वय 60 वर्ष असावे लागते. 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे वरिष्ठ नागरिकसुद्धा या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतात, कारण या स्कीममध्ये कमाल वयाचे कोणतेही बंधन नाही. स्कीम अंतर्गत एक व्यक्ती कमाल 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते. किमान मासिक पेन्शन 1,000 रुपये आणि कमाल 9,250 रुपये आहे. पेन्शन पेमेन्टचा लाभ मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर घेता येतो.

या स्कीमचा लाभ घेण्यासाठी योग्य अर्जदाराला एक अ‍ॅप्लीकेशन फॉर्म भरावा लागतो. या फॉर्मसोबत काही जरूरी डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. ऑनलाइन सुद्धा अर्ज करता येतो.

कर्जाची सुविधा सुद्धा मिळते
योजनेत काही खास प्रकरणात प्रीमॅच्युर विड्रॉलची सुद्धा सुविधा मिळते. या योजनेचा लाभ घेत असलेल्या व्यक्ती किंवा त्याच्या पती/पत्नीला कोणताही गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी ही सुविधा मिळते. परंतु, अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये पर्चेज प्राईसच्या केवळ 98 टक्के सरेंडर व्हॅल्यूच परत केली जाते. योजनेत तीन वर्षानंतर कर्जाची सुविधा मिळते. कर्जाची रक्कम पर्चेज प्राईसच्या 75 टक्केपेक्षा जास्त असू शकत नाही.