Prakash Ambedkar | आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) बुलढाणा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) देखील भाष्य केले. राज्याचा कारभार हा डेअली बेसीसवर (रोजंदारी) सुरु आहे, असा टोला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्य सरकारला लगावला.

 

महाराष्ट्र राज्याचा कारभार हा रोजंदारीवर सुरु आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम निकाल दिला आहे. अंतिम निकाल अद्याप दिलेला नाही. त्यामुळे हे शिंदे-फडणवीस सरकार अस्थीर आहे. न्यायालयाने अंतिम निर्णय लवकरात लवकर देऊन हे सरकार स्थीर करावे. न्यालयाने अर्धवट निकाल दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Assembly Vice President Narhari Zirwal) यांनी 16 आमदारांवर केलेली अपात्रतेची कारवाई अद्याप प्रलंबित आहे. अनेक गुंतागुंतीचे प्रश्न प्रलंबित असल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले.

 

राज्यपालांनी ज्याप्रकारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)
यांना सरकार स्थापनेसाठी बोलावले ते योग्य होते का, राज्यपालांना ते अधिकार आहेत
का, राज्यपाल म्हणजे सूलतान आहेत का, याची उत्तरे सर्वोच्च न्यायालयाने देणे गरजेचे आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तसेच महिन्याभरापूर्वी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्याकडे आम्ही युतीची मागणी केली होती.
पण अद्याप त्यांचा आम्हाला कोणाताही निरोप आलेला नाही किंवा निर्णय कळविला नाही.
त्याबरोबर आम्ही जरी त्यांच्याकडे युतीसाठी हात केला असला, तरी आगामी जिल्हा परिषद (Zilla Parishad)
आणि महापालिका निवडणूक (Municipal Elections) स्वबळावर लढविणार आहोत, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

Web Title :- Prakash Ambedkar | Prakash Ambedkar announced that he will fight the upcoming Zilla Parishad and Municipal elections on his own

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Almatti Dam | अलमट्टी धरणाची उंची वाढवून कोल्हापूर बुडवू पाहत आहेत, आमदार सतेज पाटील यांनी दिला इशारा

Rohit Pawar | भाजप याद्या बघून काम करते, ते विद्यार्थ्यांची परिस्थिती बघत नाहीत; फी वाढीवरुन रोहित पवारांचा भाजपवर आरोप

Pune Crime | दुचाकी चोरणाऱ्या सराईताला फरासखाना पोलिसांकडून अटक, 16 दुचाकी जप्त