प्रणती राय प्रकाशनं दिग्गज ‘गायक’ किशोर कुमारला समर्पित केलं ‘हे’ गीत ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  लव्ह आज काल फेम अभिनेत्री प्रणती राय प्रकाश तिच्या हसमुख वृत्तीसाठी ओळखली जाते, “फॅमिली ऑफ ठाकूरगंज” चित्रपटातून प्रणति राय प्रकाशने सिनेमा उद्योगात पदार्पण केले. प्रणतीला इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनात “लव आज कल २” मध्ये कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करण्याची संधी मिळाली.

https://www.instagram.com/p/CCqf740AQRR/

लॉकडाउन सुरू झाल्यापासून प्रणती सोशल मीडियावर स्वयंपाक करण्यापासून योग आणि नृत्यापर्यंत आश्चर्यकारक व्हिडिओसह तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. प्रणती या लॉकडाऊनमध्ये नवीन उपक्रम शिकण्यासाठी प्रेक्षकांना प्रेरणा देताना दिसत आहे. प्रणतीने आपल्या सोशल मिडियावर एक वाद्य वाजवत “एक अजनबी हसीना” हे गाणं गात आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हे गीत “अजनबी” चित्रपटातून किशोर कुमारच्या आवाजात प्रदर्शित झाले होते.

https://www.instagram.com/p/CCgfusng-VS/

“मानफोडगंज की बिन्नी” या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर प्रणती तिच्या आगामी अल्ट बालाजी वेब सीरिज “कार्टेल” मध्ये दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CCLunhxAKHS/

https://www.instagram.com/p/CCETHM_gXLg/

https://www.instagram.com/p/CB7l4zrgzvx/