Pravin Darekar | प्रवीण दरेकरांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा ! कोर्टानं मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते (BJP Leader) आणि राज्याचे विधानपरिषदेचे (Legislative Council) विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) मोठा दिलासा दिला आहे. मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात (Mumbai Bank Bogus Labor Case) सोमवारपर्यंत अटक (Arrest) न करण्याचे मुंबई पोलिसांना (Mumbai Police) निर्देश दिले आहेत. सरकारी वकीलांनी (Public Prosecutor) अटकपूर्व जामीन अर्जावर (Pre-Arrest Bail Application) उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. प्रवीण दरेकरांविरोधात (Pravin Darekar) खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात (MRA Marg Police Station) गुन्हा (FIR) दाखल आहे. याच प्रकरणात दरेकरांना दिलासा मिळाला आहे.

 

मुंबै बँक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका (Petition) दाखल केली होती. या प्रकरणावर तातडीने सुनावणी व्हावी यासाठी दरेकरांच्या वकिलांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मुंबै बँकेत संचालक पदाच्या निवडणुकीत (Election) स्वत:ला मजूर म्हणून दाखवणं दरेकरांना चांगलच महागात पडलं आहे. यानंतर दरेकर यांनी उच्च न्यायालयात (High Court) अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत त्यांना मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार दरेकर यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली.

प्रवीण दरेकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आभात पोंडा (Senior Lawyer Abhat Ponda) यांनी युक्तीवाद केला.
ज्यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केलं की, आज दैवकृपेने आणि जनतेच्या आशिर्वादाने पुढारी आहे, परंतु त्या काळात सहकारी संस्थेत (Co – Operative Society) मी मजूरच होतो.
प्रतिज्ञा या मजूर सहकारी संस्थेत साल 1997 मध्ये सभासद होतो.
मात्र 25 वर्षापूर्वीच्या प्रकरणात पोलिसांनी नोंदवलेली ही तिसरी एफआयआर आहे.
अशी माहिती दरेकर यांच्यावतीने देण्यात आली.
तसेच मुबै बँकेतील अध्यक्ष पदाचा गैरवापर करत आर्थिक अफरातफर केल्याचा आरोपही बिनबुडाचा असल्याचा दावा त्यांनी केला होता.

 

Web Title :- Pravin Darekar | mumbai sessions court gives relief to praveen darekar instructs mumbai police not to arrest him till monday

 

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा