Presidential Election 2022 | निवडणूक आयोगाची घोषणा ! राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर; 18 जुलैला मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Presidential Election 2022 | एकिकडे राज्यसभा, विधान परिषद आणि राज्यातील महापालिकांच्या निवडणूकीचा धुमधडाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य, देशपातळीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आता राष्ट्रपतीपदासाठी देखील निवडणूक (Presidential Election 2022) जाहीर करण्यात आली आहे. 18 जुलै 2022 रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. याबाबत माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) दिली आहे.

 

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election 2022) 15 जून ते 29 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर 2 जुलै पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

 

दरम्यान, सध्या भाजपच्या (BJP) नेतृत्वातील एनडीएकडे विरोधकांपेक्षा अधिक संख्या आहे. त्यामुळे एनडीएचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 50 टक्के मतदान एनडीएचे उमदेवार रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या बाजूने झाले होते. काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर संसदेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात.

 

असा असणार कार्यक्रम –

15 जूनला अधिसूचना जारी होणार
29 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार
18 जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक
21 जुलैला राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल

 

Web Title :- Presidential Election 2022 | ec announces schedule for presidential polls voting to be held on july 18 details here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा