पश्चिम बंगलाच्या दौर्‍यावर असलेल्या PM मोदींची CM ममता बॅनर्जींनी घेतली भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी शनिवारी कलकत्तामध्ये पोहचले आहे. या दरम्यान ते कलकत्त्यात एका समारंभात सहभागी होतील. पश्चिम बंगालला पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या या दौऱ्या दरम्यान पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात आंदोलनं सुरु आहेत.

पंतप्रधान मोदी कलकत्ता पोर्ट ट्रस्टच्या 150 व्या वर्धापन दिनाच्या समारंभात सहभागी होतील. ममता बॅनर्जी यांच्याशी पंतप्रधान मोदींची राज भवनात बैठक झाली. या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याची माहिती सध्या नाही.

कलकत्ता पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्रमात सहभागी होणार पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी बीबीडी बाग भागात ऐतिहासिक करेंसी इमारतीत जातील, जेथे एका कार्यक्रमाचे ते उद्घाटन करतील. पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की तेथे पंतप्रधान चार वारसा स्थळांना राष्ट्रला समर्पित करतील.

पीएमओ कडून सांगण्यात आले की या वास्तूंमध्ये जुनी करेंसी इमारत, बेल्वेदेर हाऊस, मेटकाफ हाऊस आणि व्हिक्टोरिया मेमोरिअलचा समावेश आहे. सांस्कृतिक मंत्रालयाकडून या इमारतींची दुरुस्ती केली आहे. मोदी रविवारी कलकत्ता पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्रमात सहभागी होतील. तसेच पोर्ट ट्रस्टचे सध्याचे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन फंडची कमतरता पूर्ण करण्यासाठी 501 कोटी रुपयांचा चेक देखील देतील.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/