भूतान ‘शेजारी’ असणं हे आमचं ‘भाग्य’, दोन्ही देश पुढे जात आहेत : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदी सध्या दोन दिवसाच्या भूतान दौऱ्यावर आहेत. भूतानचे पंतप्रधान शेरिंग आणि पीएम मोदी यांना यावेळी विविध बाबींवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर सुरुवातीलाच भूतानमध्ये येणे हे माझ्यासाठी सौभाग्य आहे. ते यावेळी म्हणाले की भूतान आपला शेजारी आहे हे आपल्यासाठी भाग्य आहे. दोन्ही देश मिळून विकासाच्या दिशेने पुढे जात आहे.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की १३० कोटी भारतीयांच्या मनात भूतानसाठी विशेष स्थान आहे. मी खूप आनंदी आहे की मी दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला भूतानला आलो आहे.

मोदी म्हणाले की आम्हाला आनंद आहे की भूतानमध्ये आज आम्ही रुपे कार्ड लॉन्च केले आहे. यामुळे व्यापारात मदत मिळेल. भूतानमध्ये मोदींनी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग यांनी हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लॅंटचे देखील उद्घाटन केले.

भूतानच्या विमानतळावर मोदींचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या भेटीत मोदींनी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भूतानच्या नेत्यांबरोबर विविध मुद्यांवर चर्चा केली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like