काय सांगता ! होय, येरवडा कारागृहातील कैद्यांनी ‘या’ व्यवसायातून कमवले तब्बल 8 कोटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हेगार हा जन्माने गुन्हेगार नसतो, परिस्थितीनुसार गुन्हेगारीकडे वळतो. गुन्हेगाराची प्रकरणे अगदी संवेदनशिलपणे हाताळून ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाही यासाठी त्यांचे चांगल्या पद्धतीने समुपदेशन करून त्यांचे पुनर्वसन आणि त्यांना सुधारण्याचे उपक्रम राबवले जातात. असाच सर्वात मोठा उपक्रम पश्चिम महाराष्ट्रातील येरवडा कारागृहात केला जातो.

येरवडा कारागृहामध्ये 6 हजार कैदी आहेत. त्यापैकी दीड हजार दोषी कैद्यांना शिक्षा झाली आहे. चांगली वागणूक असणाऱ्या कैद्यांना ओपन जेलमध्ये पाठवले जाते. असे कैदी पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नयेत आणि समाजात त्यांना स्वत:चं पोट भरण्यासाठी पायवर उभं राहता येण्यासाठी या ठिकाणी त्यांना चांगले स्किल्स शिकवले जातात. येरवडा कारागृहा राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये कैद्यांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्यातील कौशल्याचा वापर करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. किंवा त्यांच्याकडून एखादा व्यवसाय करवून घेतला जातो. असे उपक्रम हातावर मोजण्याइतक्याच तुरुंगात चालवले जातात.

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांना सुधारण्यासाठी प्रयोगशाळा असल्याचे दिसते. या कारागृहाची कमाई कोटींमध्ये आहे. कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार वार्षिक उत्पन्न 7 ते 8 कोटी रुपये आहे. या तुरुंगात राबवण्यात येणारे उपक्रम राज्यातील इतर तुरुंगातही राबवले जात आहे. येरवडा कारागृहातील वरिष्ठ प्रशासनाकडून 100 दोषी कैद्यांना हाय सलून आणि कपडे इस्त्री करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

येरवडा कारागृहातील काही दोषी कैद्यांची निवड खुल्या कारागृहासाठी करण्यात आली. तर कारागृहाजवळील दोन सलूनमध्ये नोकरी देण्यात आली आहे. इतर कैद्यांकडून इस्त्रीची कामे करून घेतली जातात. यामुळे कारागृहातून सुटका झाल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात जाऊ शकतात.

कारागृहात देण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणामुळे कारागृहातून सुटल्यानंतर त्याचा वापर करून ते आपले पोट भरू शकतील आणि समाजात पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करतील. चांगले उत्पन्न मिळाल्याने ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाहीत असा विश्वास येरवडा प्रशासन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच या कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी एक वेगळी यंत्रणा कार्य करत असते. अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवणारे हे एकमेव कारागृह असल्याचे सांगितले जाते.

फेसबुक पेज लाईक करा –