Prithviraj Chavan On NCP Crisis | ‘…तर अजित पवारांसह सर्व मंत्री निलंबित होतील ‘, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Prithviraj Chavan On NCP Crisis | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांच्यासह काही आमदारांनी पक्षात बंडखोरी (Rebellion) करत शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गट सत्तेत सामील झाला असला तरी या गटाने अद्याप सर्व समर्थक आमदारांना एकत्रित बोलावून शक्तीप्रदर्शन केलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाकडे नेमके किती आमदार आहेत? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यावर माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (Prithviraj Chavan On NCP Crisis)

 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अजित पवार गटाकडे दोन-तृतीयांशासाठी आवश्यक असणारे 36 आमदार नाहीत. त्यामुळे पक्षांतर कायद्यानुसार (Defection Act), अजित पवारांसह सर्व मंत्री निलंबित होतील, असं मोठं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Prithviraj Chavan On NCP Crisis)

 

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाकडे 36 आमदार नाहीत. अजूनपर्यंत त्यांच्याकडे 36 आमदार दिसले नाहीत. त्यांच्याकडे 36 आमदार (NCP MLA) असते तर त्यांनी प्रदर्शन केलं असतं. त्यांचा फोटो काढला असता. त्यामुळे त्यांच्याकडे दोन-तृतीयांश आमदार नसतील, तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होईल. ज्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, ते सर्व आमदार निलंबित होतील. त्यांचं सदस्यत्व रद्द होईल, असं चव्हाण म्हणाले.

सदस्यत्व रद्द झाल्यानंतर या आमदारांना विद्यमान विधीमंडळात मंत्री होता येणार नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा निर्णय ‘हो’ किंवा ‘नाही’, असं झाला पाहिजे. हे आमदार निलंबित (MLA Suspended) होणार नसतील तर त्यांच्याकडील 36 आमदारांचा आकडा त्यांनी दाखवावा. हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न नाही, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

 

पक्षाध्यक्षांकडून 9 आमदारांचे निलंबन

राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्या नऊ मंत्र्यांचं निलंबन केलं आहे,
मग विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) त्यांना अपात्र (MLA Disqualified)
का ठरवत नाहीत असा सवाल करत पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.
विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहेत असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे.

 

Web Title : Prithviraj Chavan On NCP Crisis ‘…then all ministers including Ajit Pawar will be suspended’, Prithviraj Chavan’s big statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Symptoms of Cholera | पावसाळ्यातील धोकादायक आजार कॉलरा, काही तासातच शोषले जाते शरीरातील पूर्ण पाणी, अशाप्रकारे करा बचाव

Health tips | बाथरूममधील 5 वस्तू आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक, काळजी घेणे अतिशय गरजेचे, जाणून घ्या दुष्परिणाम

Girish Mahajan |  ‘2024 च्या निवडणुकी आधी राज्यात मोठ्या घडामोडी’, मंत्री गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य