ब्लॅकमेल करुन ‘प्रायव्हेट डिटेक्टिव्ह’चा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनाच्या ओढ्यात झालेल्या खुनाचा उलगडा भोसरी पोलिसांनी केला आहे. खून झालेल्याचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. त्यातून त्यांची जवळीक निर्माण झाली आणि ते व्हिडीओ आरोपींच्या हाती लागले. त्या व्हिडीओवरून त्याच्याकडे पैशाची मागणी केली. दरम्यान मला यांनी खूप त्रास दिला असून त्यांची ‘विकेट’ पडणार म्हटल्याने चिडून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. लवकुश पांडे (२५, रा. भोसरी) याचा खून झाला आहे.  या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db32907c-c16d-11e8-abbe-2564f431b8f8′]

सविस्तर माहिती अशी की, भोसरी आळंदी रस्त्यावर बनाच्या ओढ्यात एक मृतदेह पडला असल्याची माहिती शनिवारी रात्री भोसरी पोलिसांना मिळाली. तात्काळ घटनास्थळी पोलीस पोहचले. एक मृतदेह पडला असून त्याचे दोन्ही हात कुत्र्यांनी कुरतडलेले आढळून आले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती  रुग्णालयात पाठवला. भोसरी येथील निर्जन परिसरात हाय टेंशन टॉवरलाईन जवळ बर्मुडा घातलेला अर्धनग्न  मृतदेह मिळून आला. त्यावर धारधार हत्याराने वार करण्यात आले होते.

[amazon_link asins=’B07418TNB1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’12885dcc-c16e-11e8-9e78-b9bad530ea18′]

मुंबई : कॅशिअरचाच स्टेट बँकेवर डल्ला… चोरले ४३ लाख… अन उडवले जुगारात

याचा तपास भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केला. पोलिसांनी रात्रभर तपास करून आरोपींना ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता या खुनाचा उलगडा झाला. यातील अटक आरोपी आणि पांडे हे सर्वजण सांगवी येथील एकाच प्रायव्हेट ‘डिटेक्टिव्ह एजन्सी’ मध्ये दिवसा काम करत होते. तर रात्री कुरियर कंपनीसाठी काम करत होते. पांडे याचे मोशी येथील एका मुलीवर प्रेम होते. त्यामुळे त्यांच्यात जवळीक आली. त्याचे व्हिडीओ आरोपींना मिळाले. त्यामुळे त्याच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केल्यावर पांडे ५० हजार देण्यास तयार झाला. मित्र असूनही मला आरोपींनी खूप त्रास दिला असल्याने त्यांची विकेट पडणार असे तो एकाकडे बोलला. हे आरोपींना समजले.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f62536fb-c16d-11e8-a4b9-31026c22f4d8′]

खून झालेल्या आदल्या दिवशी हे सर्वजण आळंदीला गेले होते. तेथे ते गांजा पिले. आळंदीतुन ते परत आले आणि पुन्हा पांडेला बनाच्या ओढ्यात नेले. तिथे धारदार हत्याराने वार करून खून केला. तपास भोसरी पोलीस करत आहेत.