Privatisation | केंद्र सरकार लवकरच करणार या मोठ्या सरकारी कंपनीचे खासगीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार लवकरच एका मोठ्या सरकारी कंपनीचे खासगीकरण (Privatisation) करणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आलेले असून, पुढील वर्षाच्या सुरुवातीला सरकार यासाठी निविदा मागवणार असल्याची माहिती आहे. सरकारी बँका आणि अनेक कंपन्यांमधील हिस्सा विकल्यानंतर आता लवकरच आणखी एका कंपनीचे खासगीकरण (Privatisation) होण्याच्या मार्गावर आहे.

 

केंद्र सरकार पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (CONCOR) या सरकारी कंपनीचे खासगीकरण करण्यासाठी निविदा मागविणार आहे. एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. याशिवाय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला या महिन्यात नॉन-कोअर आणि जमीन मालमत्ता वेगळ्या करण्यासाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर सरकार मार्च किंवा एप्रिलमध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचीदेखील आर्थिक बोली आमंत्रित करणार आहे. मार्चमध्ये संपणार्‍या चालू आर्थिक वर्षात आणखी कोणतीही धोरणात्मक हिश्श्याची विक्री अपेक्षित नाही. अशा परिस्थितीत 65,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकार छोटा हिस्सा विकण्यावर अधिक भर देणार आहे.

 

आम्ही ध्येयाचा पाठलाग करत नाही. परंतु, ज्या ठिकाणी मूल्य मिळेल त्या ठिकाणी आम्ही निर्गुंतवणूक करू,
असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बीईएमएल, एचएलएल लाइफकेअर, एससीआयच्या धोरणात्मक विक्रीची समापन प्रक्रिया पुढील आर्थिक वर्षापर्यंत सुरू राहू शकते,
असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच कॉनकॉरची धोरणात्मक विक्री पुढील आर्थिक वर्षात पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास दहा महिन्यांचा अवधी अपेक्षित आहे.
जानेवारीपर्यंत कॉनकॉरसाठी स्वारस्य पत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

 

Web Title :- Privatisation | privatisation big news another company will be privatised modi government the concor process will start in january

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई