‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील बोल्ड सीनबद्दल प्रिया बापट म्हणते..

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रीचे नावांची चर्चा चालु असते. यामध्ये आघाडीचे नाव म्हणजे प्रिया बापट हिचे नाव आवर्जुन घेतले जाते. प्रियांने अनेक चित्रपटामध्ये छान काम केले आहे. त्याचबरोबर तिने प्रत्येक चित्रपटात वेगवेगळी भूमिका पार पाडली आहे. नुकताच तिने डिजिटल मध्ये पाऊल टाकले आहे. सध्या तिची पहिली वेब सिरीज व्हायरल झाली आहे. या वेबसिरीज ला प्रेक्षकांनी ट्रोल केले आहे. यावर तिने म्हंटले आहे की ?

प्रिया बापट ची नुकतीच ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही तिची पहिलीवहिली वेब सीरिज ‘हॉटस्टार’ या अॅपवरून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यावेबसीरिजची चर्चा खुप चालत आहे. या चर्चामागचे कारणही तसेच आहे. या मध्ये प्रियाचा बोल्ड सीन आहे. जो की खुप व्हायरल होत आहे.

या वेब सीरिजला प्रेक्षकांनी खुप ट्रोल केले आहे. याबद्दल प्रिया बापट म्हणाली की, ‘अशा प्रकारच्या ट्रोलिंगला मी आजवर कधीच उत्तर दिले नाही. माझ्यावर कपड्यांवरुन खुप टीका केली. उदा. हेच कपडे का घातले, इतके छोटे कपडे का घातले असे प्रश्न मला विचारण्यात आले. पण यावर काही न बोलता काम करत राहणे मला योग्य वाटले. मी आजपर्यंत तेच केले आहे. प्रेक्षकांनी वेब सिरिज पाहिली जर त्यांनी त्या दृश्यांचे महत्व कळाले, तर हे दृष्य काय आहे हे ही समजेल.’

पुढे ती म्हणाली की, बोल्ड सीनबाबत मला वाटते की, ते तुमच्या कथेचा भाग आहे का? तुम्ही कोणती भूमिका साकारता आहात ? दिग्दर्शक कोण? ते दृष्य कथेची गरज म्हणून करता की फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे? तुमच्या त्या दृश्याची कथेत खरंच मोठा फरक पडणार आहे का ? या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या असतात. या सीरिजमध्ये प्रिया ही पोर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सिरिजला साजकारणाची पार्श्वभूमी आहे.