बोल्ड सीननंतर ‘या’ राज्यात प्रिया बापटविषयी सर्वाधिक गुगल सर्च

मुंबई : वृत्तसंस्था – अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या प्रियाने आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही तिची पहिलीवहिली वेब सीरिज ‘हॉटस्टार’ या अ‍ॅपवरून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमधील प्रिया बापटचा एक बोल्ड सीन व्हायरल होत आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. ती केवळ चर्चेतच आली नसून गुगलवर तिला तितकंच सर्चसुद्धा केलं जाऊ लागलं आहे. विशेष म्हणजे प्रिया बापटचा दक्षिण भारतातील गुगल सर्च वाढला आहे.

गुगल ट्रेण्ड ’नुसार ३ मेपासून प्रिया बापटचा सर्च वाढला आहे. याच दिवशी ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजपेक्षाही जास्त प्रियाला सर्च केलं जातंय. प्रिया बापटला गोवा, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षाही अधिक सर्च केलं गेलं आहे.

या बापट, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, सचिन पिळगांवकर अशी तगडी स्टारस्ट असलेली ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये प्रिया पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारत आहे. गीतिका त्यागीसोबत असलेल्या प्रियाच्या या बोल्ड सीनमुळं तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जातंय. नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजला राजकारणाची पार्श्वभूमी आहे.