‘देशाची मुलगी’ प्रियंका चोपडानं परदेशातून केली मदत, PM मोदींनी झाले ‘भावूक’

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या पूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. अशात देशातील अनेक कालाकार असे आहेत जे या कठिण काळात दान देऊन लोकांना मदतीचा हात देत आहेत. यात बॉलिवूड स्टार अक्षय कुमार, वरुण धवन, अनुष्का शर्मा, सलमान खान यांच्यासोबतच प्रियंका चोपडा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यानंही पीएम केअर्स फंडात पैसे डोनेट केले आहेत. पीएम केअर्स फंडात दान केल्यानंतर प्रियंका चोपडा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटवर एक संवाद झाला आहे. जो लोकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

प्रियंका चोपडानं पीएम केअर्स फंडात डोनेशन दिलं होतं. यानंतर पीएम मोदींनी तिचे आभार मानले आहेत. यानंतर प्रियंकानंही आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंकानं डोनेशन दिल्यानंतर पीएम मोदी म्हणाले होते, “व्यक्ती असो वा संस्था, प्रोफेशनल्स असो किंवा इतर कोणी प्रत्येकजण स्वस्थ भारतासाठी मदतीचा हात देत पुढे येत आहे. पीएम केअर्स फंडात योगदान देण्यासाठी प्रियंका चोपडा तुझे खूप खूप आभार.”

यावर प्रियंका चोपडानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटला उत्तर देताना ती म्हणते, “धन्यवाद नरेंद्र मोदी. आपण एकत्र मजबूत आहोत. या महत्त्वपूर्ण कामात मदत करणारे आणि योगदान देणाऱ्या साऱ्यांचे आभार.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like