प्रियंका चोप्राच्या घरी आला नवीन ‘पाहुणा’, अभिनेत्रीनं फोटो शेअर करत दिली माहिती
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा आला आहे. हा नवीन पाहुणा दुसरा कोणी नाही तर त्यांचा नवीन रेस्क्यू डॉग पांडा आहे. होय, प्रियंका चोप्राचे कुटूंब आता मोठे झाले आहे आणि यात आणखी एका डॉगीचे स्वागत केले गेले आहे. प्रियंका आणि निक यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पांडाचा फोटो शेअर करुन ही बातमी सांगितली आहे.
प्रियंका-निकच्या कुटूंबात आला नवीन पाहुणा
प्रियंकाकडे आधीपासूनच गिनो आणि डायना हे दोन डॉग होते आणि आता तिने पांडाला दत्तक घेतले आहे. प्रियंकाने निक आणि आपल्या सर्व डॉग्ससह एक फोटो शेअर केला आणि लिहिले- आमचा नवीन फॅमिली फोटो. पांडा. आम्ही या छुटकूला (जो फार काळ छुटकू राहणार नाही) काही आठवड्यांपूर्वी दत्तक घेतले आहे. आम्हाला नक्की माहित नाही परंतु असे दिसते की तो हस्की आणि ऑस्ट्रेलियन शेपर्डचे मिश्रण आहे. त्याचे डोळे पहा. आणि कानही!!!
प्रियंकाच्या या फोटोमध्ये त्यांची डॉग डायना खूप विचित्र दिसत आहे. यावर प्रियांकाने सांगितले की डायना फोटोशूटसाठी त्यांच्याजवळ नव्हती, म्हणून त्यांनी आपल्या फॅमिली फोटोसाठी डायनाच्या फोटोला एडिट करून घेतले आहे. त्याला उत्तर म्हणून निक जोनसचा मोठा भाऊ केविनने कमेंट्समध्ये म्हटले की- डायनाला चांगले एडिट केले आहे.
प्रियंका चोप्राकडे तीन डॉग आहेत. पहिली आहे डायना, जिला प्रियांकाने बजफीड अमेरिकेच्या क्विझच्या दरम्यान दत्तक घेतले होते. दुसरा जर्मन शेपर्ड डॉग गिनो, ज्याला प्रियंकाने तिचा नवरा निक जोनसच्या 26 व्या वाढदिवशी भेट म्हणून आणले होते आणि आता पांडा, ज्याला नुकतेच दत्तक घेण्यात आले आहे. असे मानले जात आहे की प्रियंका आणि निक यांनी हॉलिवूड हस्कीज पासून पांडा दत्तक घेतला आहे. ही संस्था हस्की आणि मिक्स ब्रीथच्या हस्की डॉग्सला वाचवण्याचे काम करते. प्रियंकाने आपल्या पोस्टमध्ये संस्थेला टॅग देखील केले आहे.