अहमदनगरमध्ये CAB आणि NRC च्या विरोधात आंदोलन

अहमदनगर : पोलीनामा ऑनलाइन – सुधारित नागरिकत्व कायद्याला तीव्र विरोध दर्शवीत नागरिकत्व संशोधन विधेयक (एनआरसी व कॅब) रद्द करण्याची मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. तर लोकशाही पध्दतीने आंदोलन करणार्‍या जामिया मिल्लियाच्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करीत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या दिल्ली पोलीसांचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.

भारताने लोकशाही स्विकारली असून, देशातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना समान अधिकार आहेत. घटनेने नागरिकांना लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्याचा अधिकार दिला असून, सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी जामिया मिल्लियाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलन दिल्ली पोलीसांनी दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सरकारने आणलेला नागरिकत्व संशोधन विधेयक घटनाबाह्य आहे. सदर कायद्याने देशात जातीय तेढ व दुफळी निर्माण होवून देशाच्या एकात्मतेला बाधा येणार असून, त्वरीत सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करण्याची मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. यावेळी जैद शेख, अ‍ॅरॉन पारधे, उमेर शेख, फरदीन खान, फैसल खान, वैष्णवी भोसले, आयेशा काझी, कौसर सय्यद, अशकान तांबटकर आदींसह महाविद्यालयीन युवक-युवती उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/