“अग्निहोत्र” या अग्निशमन दलावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

काल रविवारी अग्निशमन दलाच्या जवानांच्या सत्य अनुभवांवर आधारित “अग्निहोत्र” या पुस्तकाचे प्रकाशन आज मा.उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, महापालिका अति.आयुक्त राजेंद्र निंबाळकर, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, बासरीवादक केशवराव गिंडे गुरुजी यांच्या उपस्थितीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे पार पडले.

या पुस्तकाच्या लेखिका सौ. सारीका पाळेकर यांनी प्रथमच लेखणी हातात घेऊन अनाम प्रेम या संस्थेच्या माध्यमातून हे पुस्तक लिहले. अग्नि जेव्हा कोपतो तेव्हा भयानक तांडव प्रलय करतो. अशावेळी आग शमविण्याकरिता अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान जे काही कर्तव्य बजावतात त्याबाबत या एका गृहिणीने सत्य घटनेवर आधारित अधिकारी व जवानांचे अनुभव पुस्तक रुपात लिहले अाहे. लेखिका सारीका पाळेकर म्हणाल्या, विषेश म्हणजे या पुस्तकाची किंमत पैशाच्या रुपात नसून हे पुस्तक वाचणाऱ्याने वाचनानंतर एकदा तरी अग्निशमन दलाविषयी व जवानांच्या कार्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा हिच पुस्तकाची किंमत असेल असे सांगितले.

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9d5c9b5-b4e9-11e8-a6a9-c185a5c952c6′]

अग्निशमन दलावर लिहलेल्या “अग्निहोत्र” या पुस्तकरुपाने समाजमानसात अग्निशमन दलाविषयी व जवानांच्या कामाविषयी माहिती होण्यास नक्कीच मदत होईल. दलाचे जवान जीव धोक्यात घालून वेळप्रसंगी कसे काम करतात याचे ही कथन या पुस्तकात वाचावयास मिळते. या पुस्तकाच्या प्रती जास्त प्रमाणात लवकरच उपलब्ध करु असे संतोष पालेकर यांनी सांगितले.

मनसे कार्यकर्त्यांकडून भाजप नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड