Janmashtami 2020 : ‘या’ प्रकारे करा जन्माष्टमीची पूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   श्रीकृष्ण जन्माष्टमी येणार आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रात श्री कृष्णाचा जन्म झाला होता. मात्र यावर्षी या तारखा आणि नक्षत्र एकत्र येत नाहीत. अशा स्थितीत दोन दिवस जन्माष्टमी साजरी केली जात आहे. पण शुभ मुहूर्त १२ ऑगस्टलाच सांगितला जात आहे. कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यरात्री जुलमी कंसाचा नाश करण्यासाठीच भगवान विष्णूने मथुरामध्ये भगवान कृष्णाचा अवतार घेतला होता.

जन्माष्टमीचा मुहूर्त आणि तिथी

अष्टमीची तिथी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०६ वाजता सुरू होईल. ही तिथी १२ ऑगस्टपर्यंत सकाळी ११:१६ पर्यंत असेल. वैष्णव जन्माष्टमीसाठी हा १२ ऑगस्टचा शुभ मुहूर्त सांगितला जात आहे. बुधवारी रात्री १२.०५ ते दुपारी १२.४७ पर्यंत श्री कृष्णाची पूजा केली जाऊ शकते. ११ ऑगस्ट २०२० रोजी सूर्योदयानंतरच अष्टमी तिथीची सुरुवात होईल. या दिवशी ही तिथी पूर्ण दिवस आणि रात्रीपर्यंत राहील. भगवान कृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला होता. मात्र यावर्षी तिथी आणि नक्षत्र कृष्ण जन्मानुसार एकाच दिवशी नाहीत.

हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथीची सुरुवात ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०६ पासून होईल आणि २ ऑगस्ट रोजी ११:१६ मिनिटापर्यंत राहील. दुसरीकडे रोहिणी नक्षत्रात याची सुरुवात १३ ऑगस्ट रोजी सकाळी ०३:२७ वाजता होईल आणि ०५:२२ वाजता संपेल.

जन्माष्टमीचा उपवास असा करा

१. उपवासाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्त मध्ये उठून स्नानप्रक्रिया उरकून घ्या.
२. या उपवासाला फळांचे देखील सेवन करू शकता.
३. हातात पाणी, फळ, कुश आणि गंध घ्या आणि उपवासाचा संकल्प करा.
४. भगवान श्रीकृष्णासाठी एक झोपाळा तयार करा आणि त्यात त्यांची प्रतिमा ठेवा.
५. ही प्रतिमा बसवण्यापूर्वी बाळ श्री कृष्णाला गंगाजलने अंघोळ घातली जाते आणि नवीन कपडे घातले जातात. त्यानानंतरच त्यांना स्थापित केले जाते.
६. तुमच्याकडे मूर्ती नसल्यास तुम्ही चित्राची देखील पूजा करू शकता.
७. पूजा करताना कृष्णाबरोबर देवकी, वासुदेव, बलराम, नंदबाबा, यशोदा आणि राधा यांची पूजा केली जाते.
८. भगवान श्री कृष्णाला फुले अर्पण करा.
९. रात्री १२ वाजता चंद्र पाहून श्री कृष्णाचा झोपाळा हलवा करा आणि त्यांची जयंती साजरी करा.
१०. भगवान श्रीकृष्णाची आरती करा आणि मंत्रांचा जप करा.
११. श्रीकृष्णाला लोण्याचा भोग नक्की लावा.
१२. शेवटी प्रसाद वाटा.