Pulwama terror attack : कॅन्सरग्रस्त आईची शहीद मुलाला हाक ; घर कब आओगे

लखनऊ : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्यात ४४ जवान शाहिद झाले आहेत. यापैकी अनेक जवान सुट्टीवरून परतत होते. दरम्यान या शहीद जवानांमध्ये उत्तर प्रदेशमधल्या चंदोली येथील अवधेशकुमार यादव यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, शहीद अवधेशकुमार यांची आई कॅन्सर पीडित आहे. त्यांच्या आईला आपला मुलगा शहीद झाला आहे हे माहीत नाही. अजूनही ती आई आपल्या मुलाच्या येण्याची वाट पाहत आहे. १२ फेब्रुवारी रोजी अवधेश कुमार सुट्टी संपवून कर्तव्यावर रुजू झाले होते.

गुरुवारी ( १४ फेब्रुवारी ) दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यादरम्यान ४४ जवान शाहिद झाले आहेत. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा दहशतवादी हल्ला घडवून आणला आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक जवान सुट्टीवरून परतत होते. या शहीद जवानांमध्ये उत्तर प्रदेशमधल्या चंदोली येथील अवधेशकुमार यादव यांचाही समावेश आहे. शाहिद अवधेश यादव ४५ व्या बटालियनमध्ये तैनात होते. या हल्ल्यानंतर ही दुःखद घटना वाऱ्यासारखी संपूर्ण देशात पसरली. त्यानंतर शहिद अवधेशकुमार यांच्या गावातील गावकरी त्यांच्या घरी जमू लागले. मात्र शहिद अवधेशकुमार यांची आई कॅन्सरने पीडित असल्यामुळे कुटुंबियांनी ते शहीद झाल्याची बातमी त्यांच्या पासून लपवून ठेवली. आणि अजूनही त्यांची आई आपला मुलगा येईल याची वाट पाहत आहे.

विशेष म्हणजे, शहिद अवधेशकुमार यांच्या आईला कॅन्सर आहे. त्यामुळे त्यांचा मुलगा शहीद झाला आहे, ही गोष्ट त्यांना सांगण्याची घरातील कोणालाही हिंमत होत नाही. चंदोली जिल्ह्यातील मुगलसराय कोतवालीच्या बहादूरपूर गावात अवधेशकुमार राहतात. अवधेश यांच्या घरी ते शहीद झाल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही, परंतु माध्यमांनी शहीद जवानांची यादी प्रसिद्ध केल्यामुळे गावकऱ्यांसह अवधेश यांच्या कुटुंबियांना अवधेश शहीद झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे संपूर्ण गाव शहिद अवधेशकुमार यांच्या घरी जमा झाला. असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.