Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं गेल्या 24 तासात 10 जणांचा मृत्यू तर 234 नवे पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचं थैमान सुरूच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 234 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. सध्या पुणे शहरात 2986 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रूग्णामध्ये ससून रूग्णालयातील 15, नायडूमधील 161 तर खासगी रूग्णालयातील 58 रूग्णांचा समावेश आहे. अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 234 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यापैकी 41 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनामुळं पुणे शहरात आतापर्यंत 458 जणांचा बळी गेला आहे.

दिवसभरात 234 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ, दिवसभरात 236 रुग्णांना डिस्चार्ज, पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 9890, आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 6446