Pune : गुन्हे शाखेतील 3 पोलिस निरीक्षकांच्या पदस्थापना, एकूण 8 अधिकार्‍यांच्या नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   आयुक्तालयातील गुन्हे शाखेत बदली झालेल्या पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह यांनी आज (मंगळवार) काढले आहेत.

नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकार्‍यांची नावे आणि पुढील कंसात गुन्हे शाखेतील नेमणुकीचे ठिकाणी पुढील प्रमाणे –

1. पोनि शिल्पा चव्हाण (दरोडा व वाहन चोरी पथक – 1)
2. पोनि अनघा देशपांडे (प्रशासन, गुन्हे शाखा)
3. पोनि बालाजी पांढरे (खंडणी विरोधी पथक)
4. सपोनि प्रकाश मोरे (युनिट-2)
5. सेपानि प्रसाद लोणारे (युनिट-5)
6. उपनिरीक्षक अमोल गवळी (तपास व अभियोग कक्ष)
7. उपनिरीक्षक शशिकांत शिंदे (युनिट-4)
8. उपनिरीक्षक आनंत पिंगळे (युनिट-2)