WhatsAp वर ‘अश्लील’ मेसेज अन् गुंगीचे औषध देऊन काढले ‘न्यूड’ फोटो, अत्याचाराच्या 4 घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एका घटनेत महिलेला सतत व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेजकरून तिचा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून पाठलाग केला. तर, दुसर्‍या घटनेत घर, शाळा तसेच कामाच्या ठिकाणापर्यंत सतत पाठलाग केल्याची घटना घडल्या आहेत. तत्पुर्वी शहरात महिला अत्याचाराच्या चार घटना घडल्या आहेत. याप्रकरणी 33 वर्षीय पिडीत महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, गोपाल स्वामी (वय 37) याच्यावर विनयभंगासह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दरम्यान, फिर्यादींचा मोबाईल क्रमांक आरोपीकडे होता. त्यावेळी तो सतत फिर्यादींना व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज करत होता. तसेच, त्यांचा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून पाठलाग करत असे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी तो पाणी पिण्याच्या बहाण्याने फिर्यादींच्या घरात आला.

तसेच, त्यांचा विनयभंग केला. तर, दुसरी घटना मध्यवस्थीत घडली आहे. एका महिलेचा घरापासून शाळा आणि शाळेपासून कामाच्या ठिकाणापर्यंत पाठलागकरून विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. तसेच, पाठलागादरम्यान त्यांचा हात धरत धमकावण्यात आले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 40 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

ज्युसमध्ये गुंगीचे औषध देऊन नग्न फोटो काढले.
कोर्टात विरोधात साक्ष देण्याची धमकी देऊन महिलेला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. मात्र, महिलेने नकार दिल्यानंतर जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर ज्युसमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कर केला. त्यानंतर नग्न अवस्थेतील फोटो काढून ते पिडीत महिलेला पोस्टाने पाठविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात 41 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, वारजे माळवाडी परिसरात एकाने अल्पवयीन मुलीला गोड बोलवून तसेच लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/