Pune : 50 वर्षीय नराधमानं खाऊच्या अमिषानं 7 वर्षीय मुलीशी केलं घृणास्पद कृत्य

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – खाऊ देण्याच्या आमिष दाखवून 50 वर्षीय नराधमाने 7 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कोंढवा खुर्द परिसरात घडली आहे. पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.

जॉन सायमन डिसुझा (वय ५०, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुटूंबियासह कोंढवा परिसरात राहायला आहे. त्यांच्या जवळ असणाऱ्या इमारतीत जॉन राहायला आहे. तो साफसफाईची कामे करतो. दोन दिवसांपुर्वी ७ वर्षीय मुलगी इमारत परिसरात गेली असता जॉनने तिला खाउचे आमिष दाखवित बोलावून घेतले. त्यानंतर त्याने मुलीचा विनयभंग केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित चिमुरडीला त्याने मारहाण करण्याची धमकी दिली. नवी पेठेत देखील काही दिवसांपूर्वी एका ७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला होता. पुन्हा कोंढव्यात असाच प्रकार घडल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.