Pune : भरधाव बुलेटस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भरधाव बुलेटस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. बिबवेवाडी येथील महेश सोसायटी चौकात हा अपघात चार दिवसांपूर्वी झाला आहे. सनातन नरसू कदम (वय ६५, रा. बिबवेवाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विश्वनाथ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपुर्वी संध्याकाळी सातच्या सुमारास सनातन रस्त्याने चालले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या बुलेटस्वाराने त्यांना जोरात धडक दिली. त्यामुळे खाली पडून गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अधिक तपास उपनिरीक्षक थोरात हे करीत आहेत.