Pune : एक लाख रुपयांचे लाच प्रकरण : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षक 35 हजाराच्या लाच प्रकरणी ‘गोत्यात’, ते पण ‘पॉस्को’च्या गुन्ह्यात, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पॉस्कोच्या गुन्ह्यात आरोपी करू शकतो असे सांगत अधिकाऱ्याने 1 लाखाची लाच मागत तडजोडीअंती 35 हजार रुपयांची लाच मगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनिरीक्षक प्रशांत किर्वे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक प्रशांत हे येरवडा पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. याच पोलीस ठाण्यात पॉस्कोचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात यातील तक्रारदार आणि त्यांच्या आईला आरोपी करू शकतो असे सांगत त्यांना भिती दाखवली. आरोपी न करण्यासाठी त्यांच्याकडे 1 लाख रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात तडजोडीअंती 35 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज येरवडा पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात अनेक महिन्यानंतर लाचेची कारवाई झाल्याने आता वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर लाचखोरी थांबवणे हे एक मोठे आव्हान असणार आहे.

You might also like